महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि आत्मसमर्पित नक्षल महिलांनी बनविले 21 हजार मास्क - गडचिरोली ग्रीन झोन

पोलीस जवानांना स्वस्त दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबातीलच महिलांनी विडा उचलला आहे. मास्क बनविण्यासाठी या महिलांना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बकलवडे यांनी कापड व इतर साहित्य उपलब्ध करून दिले.

masks
masks

By

Published : May 15, 2020, 1:22 PM IST

Updated : May 15, 2020, 3:30 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आणि आत्मसमर्पित नक्षल महिलांनी मास्क बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या महिलांनी पोलीस जवानांसाठी तब्बल 21 हजार मास्क बनविले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गडचिरोली जिल्हा नक्षल्यांमुळे रेड झोन आहे. मात्र, कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात न झाल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र खबरदारी म्हणून कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे गडचिरोलीकर नियमितपणे पालन करत आहे. त्यातच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी अहोरात्र आपली सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिसाच्या जवानांना दुहेरी युद्ध लढावे लागत आहे. एकीकडे अंतर्गत नक्षलवाद तर दुसरीकडे कोरोना. सीमावर्ती भागात आणि जिल्हाअंतर्गत दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करता यावा, याकरता पोलीस परिवारानेच पाऊले उचलली आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि आत्मसमर्पित नक्षल महिलांनी बनविले 21 हजार मास्क

या उपक्रमात महिला पोलीस, पोलिसांची पत्नी, वीर पोलीस पत्नी, मुली आणि महत्वाचे म्हणजे एकेकाळी पोलिसांना जीवे मारण्यासाठी रणनीती आखण्याऱ्या आत्मसमर्पित महिला नक्षलींचाही यात सहभाग आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात मास्कचा तुटवडा पडला होता. त्यात जिथे मास्क उपलब्ध होते, तिथे अधिक दराने विक्री केली जात होती. त्यामुळे पोलीस जवांना स्वस्त दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबातीलच महिलांनी विडा उचलला आहे. मास्क बनविण्यासाठी या महिलांना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बकलवडे यांनी कापड व इतर साहित्य उपलब्ध करून दिले.

Last Updated : May 15, 2020, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details