महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींनी सॅल्युट करत दिली मानवंदना; अवघा महाराष्ट्र गहिवरला - सॅल्युट

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्याजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज आपल्या वीर जवानांना गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली.

वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींनी सॅल्युट करत दिली मानवंदना; अवघा महाराष्ट्र गहिवरला

By

Published : May 2, 2019, 6:25 PM IST

गडचिरेली- वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना देताना त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या एका कृतीने संपूर्ण गडचिरोली गहिवरून गेली आहे. यावेळी सारे दुःख बाजूला सारत वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींनी सॅल्यूट मारत साश्रू-नयनांनी जवानांना मानवंदना दिली. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.

वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींनी सॅल्युट करत दिली मानवंदना; अवघा महाराष्ट्र गहिवरला

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्याजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज आपल्या वीर जवानांना गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱया प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. यावेळी सर्वांचे लक्ष वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाकडे होते. त्यावेळी वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी आपले सर्व दु:ख बाजूला सारत आपल्या जवानांना सॅल्युट मारून भावनांना वाट मोकळी करून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details