गडचिरोली- जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले. तर, एक वाहन चालकाचाही यात मृत्यू झाला आहे. यात हुतात्मा झालेले जवान भुपेश वालोदे यांचे मावसभाऊ संदीप नागपुरे यांनी या हल्ल्यावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसमुळेच नक्षलवाद फोफावला; हुतात्मा जवान भुपेश वालोदेंच्या भावाचा गंभीर आरोप - attack
नक्षलवाद हा काँग्रेसमुळेच फोफावला असून त्यांचेच याला समर्थन आहे.

हुतात्मा झालेले जवान भुपेश वालोदे यांचे मावसभाऊ संदीप नागपुरे
हुतात्मा जवान भुपेश वालोदेंच्या भावाचा गंभीर आरोप
नक्षलवाद हा काँग्रेसमुळेच फोफावला असून त्यांचेच याला समर्थन आहे, असा गंभीर आरोप नागपुरे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, की नक्षलवाद संपवण्यासाठी मोदीच सक्षम आहेत. माझा भाऊ नोकरी सोडण्याच्या विचारात होता. खूप त्रास होत असल्याचेही तो सांगत होता, असेही ते म्हणाले.