गडचिरोली- जिल्ह्यातील दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अहेरी उपविभागातील अनेक मार्ग शुक्रवारी बंद झाले आहेत, तर शनिवारी सकाळी गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस; अनेक मार्ग बंद - गडचिरोलीत मुसळधार पाऊस
पावसाने गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद झाले आहे. तसेच आज उत्तर गडचिरोलीत पावसाचा जोर कायम आहे.
पावसाने जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद झाले आहे. तसेच आज उत्तर गडचिरोलीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा गडचिरोली जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून चार वेळा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. भामरागड-आलापल्ली मार्ग पावसाळ्यात पाच वेळा बंद झाला. आज शनिवारी सकाळी हा मार्ग सुरू झाला. मात्र, आताही पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा हा मार्ग बंद पडू शकतो