गडचिरोली- कुड्याची फुले तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर व्यक्ती जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील प्रादेशिक टसर रेशिम कार्यालयानजीकच्या भागात घडली. ज्ञानेश्वर नीळकंठ कांबळे (वय ४५) असे मृताचे नाव आहे.
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, कुटुंबीयांना मिळणार 15 लाखांची मदत - वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
घटनास्थळावरील जंगल हे टायगर कॉरिडोर म्हणून ओळखले जाते. या भागात अधूनमधून वाघाचे दर्शन होत असते. त्यामुळे वनविभागाने या भागात चौकीदार ठेवले आहेत. तरीही नागरिक जंगलात जात असतात. बुधवारी सकाळी ज्ञानेश्वर कांबळे व आनंद सोनकुसरे हे दोघे जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी गेले होते. एवढ्यात वाघ दिसल्याने आनंद सोनकुसरे झाडावर चढला. मात्र, वाघाने ज्ञानेश्वर कांबळेवर हल्ला करुन त्याला ठार केले.
घटनास्थळावरील जंगल हे टायगर कॉरिडोर म्हणून ओळखले जाते. या भागात अधूनमधून वाघाचे दर्शन होत असते. त्यामुळे वनविभागाने या भागात चौकीदार ठेवले आहेत. तरीही नागरिक जंगलात जात असतात. बुधवारी सकाळी ज्ञानेश्वर कांबळे व आनंद सोनकुसरे हे दोघे जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी गेले होते. एवढ्यात वाघ दिसल्याने आनंद सोनकुसरे झाडावर चढला. मात्र, वाघाने ज्ञानेश्वर कांबळेवर हल्ला करुन त्याला ठार केले. त्यानंतर वाघ ज्ञानेश्वरचा मृतदेह घेऊन पळाला.
घटनेची माहिती मिळताच वडसा विभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशी केली असता, घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. आरमोरी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना ३० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीस वनविभागातर्फे १५ लाख रुपयांचे सहाय्य करण्यात येते. सर्व प्रकिया आटोपल्यानंतर ही मदत देण्यात येणार आहे.