महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटरसायकलवरुन तोल गेल्याने नदीत गेला वाहून - drowning

मोटरसायकलने जात असताना तोल गेल्याने नदीत पडून एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी आरमोरी मार्गावरील खोब्रागडी नदी पुलावर घडली.

मोटरसायकलवरुन तोल गेल्याने नदीत गेला वाहून

By

Published : Aug 13, 2019, 6:29 AM IST

Updated : Aug 13, 2019, 11:29 AM IST

गडचिरोली - मोटरसायकलने जात असताना तोल गेल्याने नदीत पडून एक इसम वाहून गेल्याची घटना येथे घडली आहे. सोमवारी सकाळी आरमोरी मार्गावरील खोब्रागडी नदी पुलावर ही घटना घडली. गोवर्धन भगवान रामटेके (रा.चुरमुरा ता. आरमोरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

काल (सोमवारी) सकाळी गोवर्धन रामटेके हा व्यक्ती आरमोरी येथून मोटारसायकलने आपल्या चुरमुरा गावाकडे जात होता. वाटेत असलेल्या खोब्रागडी नदीच्या पुलावर गोवर्धनचा तोल गेला आणि मोटारसायकल पुलाच्या कठड्यांना आदळली. याचवेळी गोवर्धन नदीत पडला आणि पाण्यात वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या साह्याने शोधमोहीम राबविली. परंतु अद्यापही गोवर्धनचा मृतदेह सापडला नाही.

Last Updated : Aug 13, 2019, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details