गडचिरोली - तेंदुपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील कोंढाळा जंगलात घडली. अभिमन झीलपे (वय 55 वर्षे, रा. कोंढाळा) असे मृत मजुराचे नाव आहे.
देसाईगंज वनविभागातर्फे तेंदूपत्ता संकलन सुरू झाले आहे. त्यामुळे शेकडो मजूर तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जातात. शनिवारी सकाळी अभिमान झिलपे कोंढाळा जंगलातील पाच पांडव परिसरालगत पाने तोडण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. दुपारी घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.