गडचिरोली - कोरोना संकटामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयात अतिशय साधेपणाने महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा मुख्यालयातील कार्यक्रमाला काही ठराविक मंडळी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.
कोरोना संकटामुळे गडचिरोलीत साधेपणाने साजरा झाला महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडत असते. मात्र, कोरोना संकटामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील कार्यक्रमाला काही ठराविक मंडळींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखत अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज १ मे रोजी ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडत असते. मात्र, कोरोना संकटामुळे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच आदेश काढून केवळ जिल्हा मुख्यालयातच ध्वजारोहण होईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे जिल्हा मुख्यालय वगळता कुठेही ध्वजारोहण झाले नाही. या ध्वजारोहण कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह काही ठराविक अधिकारी उपस्थित होते. सामाजिक अंतर राखून नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने हा दिन साजरा करण्यात आला.