गडचिरोली - जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्ट्राच्या सीमेतून तेलंगणात येऊ नये यासाठी आज (रविवार) सकाळी ६.०० पासून ते उद्या सकाळी ६.०० पर्यंतचे २४ तास महाराष्ट्रातून ये-जा करण्यारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे.
तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सीमा सील महाराष्ट सीमेवर तेलंगणा सरकारकडून जवळपास १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रुग्णांची घुसखोरी होऊ नये याची दक्षता घेत तेलंगणा सरकारतर्फे पोलिसांचा चोख बंदोबस्त लवण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मागील दोन दिवसांपासून कसून तपासणी सुरू आहे.
हेही वाचा -JantaCurfew गडचिरोलीतील सर्व दुकाने बंद; बस फेऱ्या रद्द, रस्ते निर्मनुष्य
तर, जनता कर्फ्यूच्या संदर्भात आज सकाळपासून सिरोंचा महाराष्ट्र सीमेवरील गोदावरी नदी तसेच धर्मपूरीजवळ प्राणहिता नदीच्या पुलपलीकडे चेकपोस्ट उभारून संपूर्ण वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. तेलंगाणा राज्य सरकारकडून आज ते उद्या सकाळी ६.०० पर्यंत म्हणजे २४ तास हा बंद असणार आहे. तेलंगाणा पोलिसांनी महाराष्ट्र व छत्तीसगडवरुन तेलंगणामधील भूपालपल्ली जयशंकर जिल्ह्याचा प्रवेशमार्गावरील सीमा सील करून वाहतूक बंद केली आहे.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : गडचिरोली आगाराच्या 50 बसफेऱ्या रद्द लाखोंचे नुकसान