गडचिरोली -आदिवासी संस्कृती, तसेच आदिवासी समाजातील चालीरीती,लोकनृत्य, येथील पर्यटन स्थळे याबाबत इतरांना माहिती मिळावी व आदिवासी नागरिकांच्या सुप्त गुणांना वाव व चालना मिळण्याकरिता २०२२ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कार्यालय भामरागड यांच्या वतीने 'माडीया सांस्कृतिक महोत्सव- २०२२"
दिनांक २६ ते २८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात फक्त गडचिरोली जिल्ह्यातील भाग घेता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होईल, अशी माहीत अप्पर जिल्हाधिकारी तथा एकात्मिक विकास प्रकल्पाधिकारी अंकित यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी भामरागडचे तहसीलदार अनमोल काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणिपुरे, बाल विकास अधिकारी राहुल चव्हाण उपस्थित होते.
भामरागडात होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव', महामहिम राज्यपाल राहणार उपस्थित
यास्पर्धेकरीता स्पर्धक गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीच असणे बंधनकारक आहे. स्पर्धेच्या नोंदणी २० मे पर्यंत आनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्जद्वारे घेता येईल स्पर्धेची नोंदणी https://madiamahotsav.pobhamaragad.com/या वेबसाईटवर होईल. अधिक माहितीसाठी ०७१३४- २९५०५० या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी अंकित यांनी दिले.
विजेत्यांसाठी सुमारे पाच लाख रुपयसांची बक्षिसे -रेला नृत्य स्पर्धा, व्हॉलिबॉल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, नौकायन स्पर्धा,तिरंदाजी ( तिर कमठा ) व गुलेल, तीन किमी अंतर धावण्याची स्पर्धा, महोत्सवाचे पारंपरिक वेशभूषा, हस्तकला स्पर्धा, पारंपरिक खाद्यपदार्थ या स्पर्धा घेण्यात येईल विजेत्यांसाठी सुमारे पाच लाख रुपयसांची बक्षिसे ठेवली आहे.
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन -यास्पर्धेकरीता स्पर्धक गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीच असणे बंधनकारक आहे. स्पर्धेच्या नोंदणी दि.६ ते २० मे पर्यंत आनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्जद्वारे घेता येईल स्पर्धेची नोंदणी https://madiamahotsav.pobhamaragad.com/या वेबसाईटवर होईल. अधिक माहितीसाठी ०७१३४- २९५०५० या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी अंकित यांनी दिले.