गडचिरोली - गडचिरोली-चिमुर मतदारसंघात नक्षलवाद्यांच्या जाचाला कंटाळलेले आदिवासी कोणाला पुढारी बनवणार? हे आज स्पष्ट होणार आहे. यासाठी थोड्याचवेळात शहरातील कृषी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघातून भाजपकडून अशोक नेते रिंगणात होते. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचे आव्हान होते. शिवाय या दोन्ही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशकुमार गजबे यांचेही आव्हान होते. मात्र, आता यापैकी कोण नक्षलग्रस्तांचे प्रश्न संसदेत मांडणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
LIVE UPDATES -
- सा.७.५० वा - भाजपचे अशोक नेते यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उसेंडी यांचा पराभव केला.
- दु. ३.३३ वा. - अशोक नेते ६६ हजार ५२६ मतांनी आघाडीवर
- दु. २.५० वा - नववी फेरी पूर्ण, अशोक नेते ७० हजार ३० मतांनी आघाडीवर
- दु. २.२५ वा. - आठवी फेरी पूर्ण, नेते ६५ हजार ४६९ मतांनी आघाडीवर
- दु. २.१६ वा. - अशोक नेते आठव्या फेरीत ६२ हजार ५२६ मतांनी आघाडीवर
- दु. १.३८ वा. - अशोक नेते ५३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
- दु. १२.५३ वा. - भाजप नेते ५७ हजार मतांनी आघाडीवर
- स. ११.४५ वा. - चौथ्या फेरीला सुरुवात, अशोक नेते ३० हजार ३६ मतांनी आघाडीवर
- स. ११.०० वा. - भाजपचे अशोक नेते २० हजार ८७२ मतांनी आघाडीवर
- स. १०.२२ वा. अशोक नेते १४ हजार ८२ मतांनी आघाडीवर
- स. १०.१० वा. - अशोक नेते १० हजार ७३० मतांनी आघाडीवर
- स. ९.५६ वा. - तिसऱ्या फेरीत अशोक नेते ६८८९ मतांनी आघाडीवर
- स. ९.३२ वा. - भाजपचे अशोक नेते तिसऱ्या ५९३६ मतांनी आघाडीवर
- स. ९.२३ वा. - भाजपचे उमेदवार अशोक नेते दुसऱ्या फेरीत ४१९८ मतांनी आघाडीवर
- स. ९.०७ वा. - भाजपचे उमेदवार अशोक नेते आघाडीवर
- स. ८ वा - मतमोजणीला सुरुवात