गडचिरोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातभरात संचारबंदी असल्याने दळणवळण, वाहतूक व बाजार पेठा बंद आहेत. याचा फटका सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
सिरोंचाची मिरची नागपूरच्या बाजारात; शेतकऱ्यांना दिलासा - chilli farming in garchiroli
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी असल्याने दळणवळण, वाहतूक व बाजारपेठा बंद आहेत. याचा फटका सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय.
सध्या प्रशासनाने शेतकऱ्यांना मिरची नागपूरला नेण्याची परवानगी दिल्याने त्यांना या संकटातून दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनुळे सर्व माल शेतात पडून असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दरवर्षी कोतापल्ली परिसरातील शेकडो हेक्टर शेतीमध्ये उत्तम दर्जाचे मिरचीचे पीक घेतले जाते. यंदा कोतापल्ली, रेगुंठा, नारसिहपल्ली, मोयाबीनपेटा अंकीसा या भागात विपुल प्रमाणात मिरचीची लागवड झाली. मात्र, लॉकडाऊन केल्याने दळणवळण पूर्णपणे बंद झाले; आणि तोडलेली मिरची शेतामध्येच खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली. एका हेक्टरला दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. परंतु, आता नागपुरातील बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची तोडलेली मिरची शेतातच पडून आहे. यासाठी मिरची नागपूरच्या बाजारात विक्रीसाठी नेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. आता तहसीलदारांनी याला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.