गडचिरोली - जिल्ह्यात महाराष्ट्र सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी, प्रणहिता नदींच्या महापुराच्या ( Heavy rain in Gadchiroli ) वेड्याने अनेक गावाला अस्ताव्यस्त केले आहे. आज आमदार विजय वडेट्टीवार ( MLA Vijay Wadettiwar ) यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी ( Inspection of flood affected areas ) केली. पाहणी करीत असताना राज्य सरकारवर आक्रोश दाखवितांना ते म्हणाले की, कोल्हापूर, सोलापूर, सांगली पूर आला की सर्व नेते लक्ष देतात गडचिरोली या आदिवासी भागाकडे लक्ष देणारा कोण? असा सवालही आमदार वडेट्टीवार यांनी केला. पिके वाहून गेली, पिकाचे नुकसान झाले, धान्य वाहून गेले, घर वाहून गेले, रस्त्यावर येऊन रहावे लागत आहे.
हेही वाचा -Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांकडून विकास कामांना स्थगिती, अजित पवार संतापले; म्हणाले...