महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक : जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक - गडचिरोली कोरोना रुग्ण

जिल्ह्यात आज 611 रुग्ण बरे झाले असून 427 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 687 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 हजार 394 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.87 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के इतका आहे.

File photo
File photo

By

Published : May 7, 2021, 6:10 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यात आज (शुक्रवारी) नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात आज 611 रुग्ण बरे झाले असून 427 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 687 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 हजार 394 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आज 17 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 47 वर्षीय पुरुष देलोडो ता.आरमोरी, 60 वर्षीय महिला आलापल्ली ता.अहेरी, 55 वर्षीय महिला अंकिसा ता.सिरोचा , 40 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली, 65 वर्षीय पुरुष कोरेगाव ता.वडसा, 72 वर्षीय पुरुष वडसा, 52 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर, 52 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 64 वर्षीय पुरुष लेढारी ता.कुरखेडा, 50 वर्षीय पुरुष कॉम्प ऐरिया गडचिरोली, 54 वर्षीय पुरुष अंकिसा ता.सिरोंचा, 28 वर्षीय पुरुष मेढेवाडी ता.आरमोरी, 40 वर्षीय महिला महागाव ता.अहेरी, 45 वर्षीय पुरुष हेटीनगर ता.कुरखेडा, 40 वर्षीय पुरुष घारगाव ता.चामोर्शी, 50 वर्षीय महिला श्रीरामनगर कुरखेडा यांचा समावेश आहे. जिल्हयात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.87 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के इतका आहे.

तसेच नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 146, अहेरी तालुक्यातील 30, आरमोरी 44, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 50, धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 09, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 39 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 611 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 178, अहेरी 36, आरमोरी 43, भामरागड 18, चामोर्शी 33, धानोरा 25, एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 50, कोरची 42, कुरखेडा 41 तसेच वडसा येथील 87 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details