महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! कामगार नोंदणीचे शेकडो अर्ज दिले फेकून; चामोर्शी येथील प्रकार - पंचायत समिती

कामगारांना शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी केली जात आहे. मात्र, नोंदणीसाठी कामगारांनी दिलेले शेकडो अर्ज बेवारस स्थितीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार चामोर्शी येथील पंचायत समिती आवारात तसेच बाजार चौकातील सांस्कृतिक सभागृहात आज (बुधवार) समोर आला आहे

अर्ज शोधताना अर्जदार

By

Published : Jul 24, 2019, 10:12 PM IST

गडचिरोली- कामगारांना शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी केली जात आहे. मात्र, नोंदणीसाठी कामगारांनी दिलेले शेकडो अर्ज बेवारस स्थितीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार चामोर्शी येथील पंचायत समिती आवारात तसेच बाजार चौकातील सांस्कृतिक सभागृहात आज (बुधवार) समोर आला आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

कामगार नोंदणीचे शेकडो अर्ज दिले फेकून

नोंदणीकृत कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. याबाबत कामगारांमध्ये जनजागृती झाल्याने नोंदणी करण्यासाठी शेकडो कामगार गर्दी करीत आहेत. त्यामुळे कामगार अधिकारी कार्यालयाने प्रत्येक तालुका मुख्यालये तसेच मोठ्या गावांमध्ये शिबिराचे आयोजन करून कामगारांची नोंदणी केली जात आहे. असाच ३ दिवसीय शिबीर चामोर्शी शहरांमध्ये २२ जुलैला पार पडला.

या शिबिरात तालुक्यातील हजारो कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे लांबच लांब रांगा लावून कामगारांचे नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले. यासाठी कामगारांकडून शुल्कही आकारण्यात आले. मात्र, शिबिराच्या दोन ते तीन दिवसानंतर अनेक कामगारांचे अर्ज पंचायत समिती आवारात तसेच बाजार चौकातील सांस्कृतिक सभागृहात अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक कामगारांनी धाव घेत आपले अर्ज शोधण्यासाठी कसरत सुरू केली. प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details