महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत रंगला जांभूळ अन् रानभाजी महोत्सव - रानभाजी महोत्सव

चांगल्या दर्जाच्या जांभळासह बहुगुणी २८ प्रकारच्या रानभाज्यांची चव घेण्याचा आनंद गडचिरोलीकरांना मिळाला. बचत गटांमार्फत रानभाजी व जांभुळाचे विविध पदार्थ विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले उद्धाटन

By

Published : Jul 13, 2019, 9:35 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील कोरची येथील जांभळाला विदर्भासह राज्यात मोठी मागणी असते. तर पावसाळा सुरू झाला की गडचिरोलीच्या बाजारात रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. रानभाज्या व जांभळाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना ओळख मिळावी या हेतूने गडचिरोलीत जांभूळ आणि रानभाजी महोत्सव शुक्रवारी पार पडला. महोत्सवाचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

गडचिरोलीत रंगला जांभूळ अन् रानभाजी महोत्सव

कृषि विज्ञान केंद्र, सोनापुर-गडचिरोली अंतर्गत कृषि संशोधन केंद्र 'एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली'व्दारा कृषि महाविद्यालय, गडचिरोली येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन महोत्सवाचा आनंद घेतला.

गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गीकरित्या जांभळाचे उत्पादन मिळते. परंतु जांभूळ हे अल्पायुषी असल्यामुळे त्यास प्रक्रिया करून मुल्यवर्धन करणे गरजेचे आहे. जांभळामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे जांभुळ रस, सुपारी, जॅम, जेली, लाडू तसेच चॉकलेट आणि आईसक्रीम असे छोटे उद्योग उभारून महिला बचत गटांनी सक्षम होणे गरजेचे असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जांभुळ आणि रानभाजी उत्पादन तसेच मुल्यवर्धीत प्रक्रियायुक्त पदार्थाचा जिल्हा म्हणून अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.

महोत्सवादरम्यान जांभुळ बीज निष्कासन यंत्राचे वितरण करण्यात आले. यात वंदना महिला बचत गट, बेलगाव आणि जिजामाता महीला शेतकरी स्वयंसहाय्यता गट,जिमलगट्टा या दोन बचत गटांना जांभुळ बीज निष्कासन यंत्राचे वितरण करण्यात आले. तसेच जांभुळ व रानभाजी दालनासह सहभागाकरीता सहभागी बचत गटांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. चांगल्या दर्जाच्या जांभळासह बहुगुणी २८ प्रकारच्या रानभाज्यांची चव घेण्याचा आनंद गडचिरोलीकरांना मिळाला. बचत गटांमार्फत रानभाजी व जांभुळाचे विविध पदार्थ विक्रीकरीता ठेवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details