महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, उन्हाळ्यातही पाणीसाठा भरपूर - गडचिरोलीत सिंचनाची सोय

पावसाळ्यात या तलावात भरपूर पाणी जमा झाल्याने यंदाच्या मे महिन्यातही तलावात भरपूर पाणीसाठा आहे. यात मत्स्य बीज टाकले होते. सध्या एकेक मासा 3 ते 4 किलोपर्यंत वजनाचा झाला असून त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मत्स्य व्यवसायतून ग्रामस्थांना आर्थिक फायदा मिळण्यासह भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जनावरे, इतर प्राण्यांसाठीही पाण्याची सोय झाली आहे.

सिंचन तलावातील मत्स्यशेतीमुळे आदिवासी ग्रामस्थांचा फायदा
सिंचन तलावातील मत्स्यशेतीमुळे आदिवासी ग्रामस्थांचा फायदा

By

Published : May 23, 2020, 11:34 AM IST

गडचिरोली - तळगाळातील आदिवासी जनतेसाठी आरोग्य, शिक्षण आणि निरंतर सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसाठी पुढाकार घेतला. याअंतर्गत तलावनिर्मितीचे काम हाती घेतले. भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये आतापर्यंत 21 तलावांचे निर्मिती केली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत आहे. तलावात मत्स्यशेती केल्यामुळे त्यातूनही आर्थिक स्रोत मिळाला आहे.

'मानव सेवेतच माधव सेवा' आणि त्यातच समाधान मानणाऱ्या आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक कार्यांत अग्रेसर असलेल्या आमटे कुटुंबीयांपैकी अनिकेत यांनी आदिवासींसाठी सिंचनाचे कार्य हाती घेतले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी गावांमधे सिंचनाची सोय केली जात आहे. लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत भामरागड तालुक्यात 21 तलाव बांधण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर तालुक्यातील कुमरगुडा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी तलावाची निर्मिती केली होती. गावतलावाच्या निर्मितीमुळे परिसरातील शेती सिंचनखाली आली आहे.

लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, उन्हाळ्यातही पाणीसाठा भरपूर

पावसाळ्यात या तलावात भरपूर पाणी जमा झाल्याने यंदाच्या मे महिन्यातही तलावात भरपूर पाणी साठा आहे. एवढा पाणीसाठा असल्याने गावकाऱ्यांनी मच्छीपालन व्यवसाय सुरू केला. या तलावात मच्छ बीज टाकण्यात आले होते. सध्या एकेक मासोळ्या 3 ते 4 किलोपर्यंत वजनाच्या झाल्या असून त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मत्स्य व्यवसायतून ग्रामस्थांना आर्थिक फायदाही मिळाला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जनावरे, इतर प्राण्यांसाठीही पाण्याची सोय झाली आहे. या तलाव निर्मितीपूर्वी जनावरांचे मोठे हाल होत होते. इंद्रावती नदीकाठीच उपलब्ध पाण्याचा आधार होता. मात्र, आता सिंचनामुळे सर्वांचीच सोय होत आहे. दुर्गम भागात अशा प्रकारे तलाव निर्मिती करणे गरजेचे आहे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

दोन तीन किलोचा मासा

ABOUT THE AUTHOR

...view details