महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत 'बुलेट वर बॅलेट'चा विजय; पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या घातपाताविना पार पडली निवडणूक - gadachiroli assembly election

राज्यात झालेल्या मतदानात गडचिरोली जिल्हा ७०.२६ टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुर्गम भागातील आदिवासी जनतेने नक्षलवादाला न जुमानता लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त करत मोठया प्रमाणावर मतदान केले. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांयांनी मोठया प्रमाणावर बॅनर तसेच पोस्टरबाजी करुन अनेक भागातील आदिवासी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

गडचिरोलीत 'बुलेट वर बॅलेट'चा विजय; पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या घातपाताविना पार पडली निवडणूक

By

Published : Oct 25, 2019, 9:48 PM IST

गडचिरोली - निवडणूक म्हटले की नक्षलवाद्यांचा तीव्र विरोध असतो. निवडणुकीदरम्यान नक्षलवादी घातपात घडवून आणतात. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली पोलीस दलाने अतिशय उत्तम नियोजन राबविल्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. गडचिरोली पोलीस दलाचे हे ऐतिहासिक यश आहे.

गडचिरोलीत 'बुलेट'वर 'बॅलेट'चा विजय; पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या घातपाताविना पार पडली निवडणूक

राज्यात झालेल्या मतदानात गडचिरोली जिल्हा ७०.२६ टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर राहीला. दुर्गम भागातील आदिवासी जनतेने नक्षलवादाला न जुमानता लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त करत मोठया प्रमाणावर मतदान केले. विशेष म्हणजे नक्षलवादयांनी मोठया प्रमाणावर बॅनर तसेच पोस्टरबाजी करुन अनेक भागातील आदिवासी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. मलमपडुर परिसरातील नागरिकांनी नक्षल्यांनी लावलेले बॅनर व पोस्टरची होळी करत ६३.६३ टक्के मतदानाची नोंद करत नक्षलवादाला जोरदार चपराक लगावली. याच बरोबर गडचिरोलीतील अनेक भागातील जनतेने अशाच प्रकारे नक्षलवादाला विरोध करत भरघोस मतदान केले.

हेही वाचा -विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची आजवरची कामगिरी..

मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातील सी-६० जवानांनी मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी अभियान राबविले. आचारसंहितेच्या काळात पोलीस नक्षलवाद्यांत ०३ चकमकी घडुन आल्या. तसेच नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठाही सापडला. मात्र, सी-६० कमांडोने प्रभावी अभियान राबविल्यामुळे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत झाली.

हेही वाचा -'रोहित आणि राम शिंदेंची भेट हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण'

गडचिरोली पोलीस दलासह इतर सुरक्षा दलाच्या एकुण १३ हजार ५०० जवानांनी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. भारतीय वायुसेनेच्या एम. आय.१७ या तीन तसेच पवनहंसच्या दोन हेलिकॉप्टरद्वारे अतिसंवेदनशिल मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलींग पार्टी रवाना करण्यात आल्या. एकेकाळी नक्षलवादी असलेल्या आणि लोकशाहीला न मानणाऱ्या ३८० आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनीही या विधानसभा निवडणुकीत मतदान केले. निवडणुक नियोजनबद्धपणे पार पाडताना दुर्गम भागात जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, शांतता रॅली या माध्यमातुन अभियान राबविल्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी झटणारे जवान, महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक करून आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details