महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

या मतदार संघात चालले तब्बल १४ तास मतदान, रात्री ९ वाजेपर्यंत होत्या मतदारांच्या रांगा - Chimur

चामोर्शी तालुक्यातल्या घारगावात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच तब्बल १४ तास मतदान सुरू होते. या ठिकाणी रात्री ९ पर्यंत मतदान सुरू होते.  फराड्यात रात्री ८.३० वाजेपर्यंत मतदान चालले. या सोबतच चिमूर आणि ब्रम्हपुरी या विधानसभा क्षेत्रातही ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

रात्रीपर्यंत मतदान

By

Published : Apr 12, 2019, 11:06 AM IST

गडचिरोली - चिमूर मतदार संघातल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. या मतदारसंघातील गडचिरोली, आरमोरी, आमगाव व अहेरी या चार विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार होते. मात्र, ३ वाजताच्या सुमारास अचानक मतदारांनी बुथवर गर्दी केल्याने मतदान उशिरापर्यंत चालले.

चामोर्शी तालुक्यातल्या घारगावात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच तब्बल १४ तास मतदान सुरू होते. या ठिकाणी रात्री ९ पर्यंत मतदान सुरू होते. फराड्यात रात्री ८.३० वाजेपर्यंत मतदान चालले. या सोबतच चिमूर आणि ब्रम्हपुरी या विधानसभा क्षेत्रातही ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

घारगावत एकून १ हजार १८४ मतदार आहेत. त्यापैकी ८१० मतदारांनी मतदान केले. यात ४१० स्त्रिया आहेत. तर ४०० पुरूष असल्याचे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details