गडचिरोली - अहेरी मुख्यालयापासून 9 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महागाव-अहेरी मार्गावरील हकीम लॉनजवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन दुचाकीसह 1 लाख 66 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अहेरी पोलिसांकडून विदेशी दारूसह दोन मोटारसायकल जप्त - बेकायदेशीर दारू जप्त
पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक नागरिकांनी दारूचा धंदा सोडून रोजंदारीच्या कामावर जाऊन आपले कुटुंब चालवले. तरी तालुक्यासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत होती.
पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दळस पाटील, पोलीस हवालदार दुधे, चौधरी, आणि कत्रोवार यांनी गोपनीय माहितीद्वारे सापळा रचला. त्यानंतर घटनास्थळावरून दोन मोटारसायकली (क्रमांक एमएच 33 जे 3626) आणि (एमएच 34 एडी 5090 जप्त करण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक नागरिकांनी दारूचा धंदा सोडून रोजंदारीच्या कामावर जाऊन आपले कुटुंब चालवले. तरी तालुक्यासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत होती. मात्र, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी अहेरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दारूविक्री प्रमाण कमी झाले आहे.