महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! गडचिरोलीतील दाम्पत्याची कोरोनावर मात - गडचिरोली कोरोना अपडेट

आजपर्यंत आढळलेल्या 44 रुग्णांपैकी एकही जिल्ह्यात राहणारा नाही. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत.

 Corona cured patient gadchiroli, कोरोनामुक्त रुग्ण गडचिरोली
Corona cured patient gadchiroli

By

Published : Jun 9, 2020, 4:26 PM IST

गडचिरोली- जिल्ह्याला आज दिलासादायक बातमी मिळाली. शहरातील 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती बरी झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हावासियांच्या मनातील भीती दूर होऊ लागली आहे.

मंगळवारी कोरोनामुक्त झालेले दोघे जण पती-पत्नी असून, ते गुजरातमधून गडचिरोली शहरात आले होते. ते आजारातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या 44 रुग्णांपैकी 33 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्या 10 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, बाहेर जिल्ह्यातील प्रवाशांना जिल्ह्यात परतण्याची परवानगी दिल्यानंतर अनेकजण मुंबई, पुण्यातून तसेच बाहेर राज्यातून जिल्ह्यात दाखल झाले आणि कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला.

आजपर्यंत आढळलेल्या 44 रुग्णांपैकी एकही रुग्ण जिल्ह्यात राहणारा नाही. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details