महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर, नक्षल कारवायांचा घेतला आढावा - Home minister eknath shinde visit gadchiroli

जिल्ह्यातील शहरी भागात एकलव्य शाळा उभारल्या जाणार आहेत. याशिवाय शासकीय अधिकाऱयांच्या निवासी इमारती बांधून हा अडसर दूर करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

Home minister eknath shinde visit gadchiroli
गृहमंत्री शिंदे गडचिरोलीत

By

Published : Dec 22, 2019, 8:43 PM IST

गडचिरोली - राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक गडचिरोलीत पोहचले. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेत नक्षल मोहिमांचा आढावा घेतला. येथील विकास कामांना प्राधान्य देण्याचा महविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहील. नक्षल दहशत कमी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने परिश्रम घेतल्याची शाबासकी देत येथील प्रश्न विनाविलंब मंजूर करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

गृहमंत्री शिंदे गडचिरोलीत

जिल्ह्यातील शहरी भागात एकलव्य शाळा उभारल्या जाणार आहेत. याशिवाय शासकीय अधिकाऱयांच्या निवासी इमारती बांधून हा अडसर दूर करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. जिल्हा पोलीस दलाने सक्षमपणे काम केले आहे. पोलीस दलाच्या गरजांकडे लक्ष देणार असल्याचे शिंदे म्हणाले. जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पाणी सुविधा वाढवून नक्षल भय दहशत मुक्ती अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. नक्षल विरोधी जनजागरण जोरकसपणे होत आहे आणि जिल्ह्यात दोन्ही मतदान उत्तम झाले आहे.

हेही वाचा -'CAA व NRC च्या माध्यमातून राज्य आणि केंद्रात वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न'

शेती बहरासाठी छोटे सिंचन प्रकल्प उभे करत शेतीला आधुनिकतेची जोड देत मागास भागांच्या विकासाची सामूहिक जबाबदारी घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. जिल्ह्यातील लोकांना नक्षलवाद नाही तर रोजगार हवा आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग कसे येतील, याकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. गडचिरोलीचे प्रश्न विनाविलंब मंजूर करत रस्त्यांच्या वाईट स्थितीवर गती-दर्जा सुधार करण्याचे आव्हान स्वीकारू असेही ना. शिंदे म्हणाले.

हेही वाचा - अमरावतीच्या अवलियाने बांधले 'प्लास्टीकचे घर'

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरद्वारे आगमन झाले. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत नक्षल विरोधी मोहिमा आणि विकास कामांचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details