महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

milind teltumbde death मिलिंद तेलतुंबडे याच्या खात्म्याने तीन राज्यांना फायदा होणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Minister Dilip Walse Patil react

गडचिरोली पोलीस दलाच्या (gadchiroli police) अभूतपूर्व यशानंतर गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील (Home Minister Dilip Walse Patil) गडचिरोलीमध्ये दाखल झाले. गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचताच त्यांनी शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. आपल्या संवादादरम्यान जवानांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले.

Dilip Walse Patil react milind teltumbde death
मिलिंद तेलतुंबडे खात्मा दिलीप पाटील

By

Published : Nov 15, 2021, 5:48 PM IST

गडचिरोली - गडचिरोली पोलीस दलाच्या (gadchiroli police) अभूतपूर्व यशानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील (Home Minister Dilip Walse Patil) गडचिरोलीमध्ये दाखल झाले. गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचताच त्यांनी शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. आपल्या संवादादरम्यान जवानांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले.

माहिती देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील

हेही वाचा -gadchiroli encounter : 16 नक्षलवाद्यांची ओळख पटली; 10 जणांची ओळख पटविणे सुरू

मिलिंद तेलतुंबडे (milind teltumbde death) याच्या खात्म्याने तीन राज्यांना फायदा होणार असल्याचे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. तीन राज्यांतील नक्षल चळवळ कमकुवत(Naxal movement)करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले. संपूर्ण देशात मिलिंद वॉन्टेड नक्षली गुन्हेगार असल्याचे सांगत आगामी काळातही या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गडचिरोली पोलीस सर्वतोपरी योगदान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षल विरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असून, त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याचे मत गृहमंत्री मिलिंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केले.

मिलिंद तेलतुंबडे आहे तरी कोण?

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा सह्याद्री, दीपक इत्यादी टोपणनावांनी नक्षल चळवळीत ओळखला जात होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे हा मागील 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. तो प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही होता. त्याच्यावर राज्य पोलिसांनी 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

तीन राज्याचा प्रमुख

तीन - चार वर्षांपूवी महाराष्ट्र - मध्यप्रदेश - छत्तीसगड (एमएमसी) झोन स्थापन करण्यात मिलिंदने महत्वाची भूमिका पार पाडली. या झोनचा तो सर्वोच्च नेता होता. चालू आठवड्यात राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सुरजागड खाणी विरोधातील आंदोलनासंदर्भात टीका करणारे एक पत्र जारी झाले होते. त्यावर नक्षल्यांच्या दक्षिण झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याची स्वाक्षरी होती. मात्र, पत्रातील भाषेवरून ते पत्र सह्याद्री यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

3 वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शनिवारी पोलिसांनी 26 नक्षल्यांना ठार केले (Naxals killed in Gadchiroli). मागील तीन वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. 22 एप्रिल 2018 ला भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यात साईनाथ, शिनू हे मोठे नक्षल कॅडर ठार झाले होते. त्यानंतर यंदा 21 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी 13 नक्षल्यांचा खात्मा केला होता. शनिवारच्या चकमकीतही नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह आणखी काही मोठे नेते ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई ठरली आहे.

हेही वाचा -Naxals killed in Gadchiroli : चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार; अधिकृत माहिती समोर

ABOUT THE AUTHOR

...view details