गडचिरोली -जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने कहर ( Heavy rain in Gadchiroli district ) केला होता. अनेकांचे घरे उध्वस्त झाले, हजारो एकर शेती जमीनदोस्त झाले होती. कही दिवस उंसत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला ( intensity of rain increased in Gadchiroli) आहे. गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा तालुक्यात काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यामध्ये अतिवृष्टी ( Heavy rain in Bhamragarh taluka ) सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन जन जीवन विस्कळित ( Flood in Bhamragarh taluka ) झाले. पावसाचा सर्वाधिक फटका चौथांदा भामरागडला बसला आसून पर्लकोटा नदीच्या पूल पाण्याखाली गेला आहे.
गरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाकडून आवाहन -भामरागड तालुक्याचा मुख्यालयाशी पुर्णपणे संपर्क तुटला आहे. भारतीय हवमान विभागाने ( Indian Meteorological Department ) पुढील 48 तासाकरीता अतिवृष्टी इशार दिल्याने गडचिरोली प्रशासन दक्षाता घेण्यात येत आहे. नदी किनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी, नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये असे, प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
राष्ट्रीयमार्गवरील वाहतूक ठप्प -पर्लकोटा नदीच्या पुला जवळ सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भामरागड शहरा लागत वाहत असलेल्या पर्लकोटा नदीची पातळी वाढली आहे. चार कि.मी अंतरावरील कुमरगुडा नाला तसेच कुडकेली जवळच नाल्यावर पाणी वाहत असल्याने भामरागड आलापल्ली हा राष्ट्रीयमार्गवरील वाहतूक ठप्प झाला आहे. तालुक्यातील 60 ते 70 गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.