दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद - दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती
मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- सिरोंचा, रेपनपल्ली- कमलापूर, अहेरी- गडअहेरी हे मार्ग सद्या पुरामुळे बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद
गडचिरोली -गुरूवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांचा यात समावेश आहे.