गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अशातच बुधवारी दुपारी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. वातावरणातील या बदलामुळे थंडीचा जोर वाढला आहे.
गडचिरोलीत अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फटका
धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यासह गडचिरोली शहरात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. वातावरणातील या बदलामुळे थंडीचा जोर वाढला आहे.
हेही वाचा-निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यासह गडचिरोली शहरात पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने रब्बी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पन्नाची आशा असताना सतत ढगाळ वातावरण व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.