गडचिरोली- जिल्ह्यात मंगळवारी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिना उलटत आला असतानाही अधून-मधून पाऊस सुरुच आहे. त्यामुळे या पावसाचा खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा - पाऊस बातमी गडचिरोली
मंगळवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील असलेल्या एका छोट्या पुलावर पाणी चढले.
![गडचिरोलीत मुसळधार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4543419-thumbnail-3x2-gad.jpg)
गडचिरोलीत मुसळधार पाऊस
गडचिरोलीत मुसळधार पाऊस
हेही वाचा-महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव
मंगळवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील असलेल्या एका छोट्या पुलावर पाणी चढले. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पावसाच्या सरी बरसतच असल्याने धान पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.