गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख 10 मार्ग बंद - शोधग्राम प्रकल्पाला पुराचा वेढा
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत.
गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमूख 10 मार्ग बंद
गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत. यात गडचिरोली-नागपूर या मार्गाचाही समावेश आहे.