गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड-आलापल्ली मार्ग शनिवार रात्रीपासून बंद झाला आहे. आज काही प्रमाणात पूर ओसरला असला तरी कुमरगुडा नाल्यावर पुराचे पाणी असल्याने भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पुरामुळे सिरोंचा-असरअल्ली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या पुढे सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, काल पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली आहेत. तर, तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.