महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकबिरादरीत १८२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; लोकबिरादरीसह रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम - dr mandakini amte

हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालय व रोटरी क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हेमलकसा येथे अनेक व्याधींनी ग्रस्त १८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

lokbiradari
लोकबिरादरीत १८२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

By

Published : Jan 21, 2020, 8:31 AM IST

Updated : Jan 21, 2020, 2:51 PM IST

गडचिरोली- जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालय व रोटरी क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हेमलकसा येथे अनेक व्याधींनी ग्रस्त १८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुर्गम भागातील नागरिकांकडे दोनवेळा अन्नासाठी संघर्ष करत असल्याची परिस्थिती होती. भामरागड व्यतिरिक्त शहरी भाग त्यांना माहिती नाही. रुग्णालयात जाऊन फायदा होत नसून ते बुवाबाजी करत अंधश्रद्धेचा बळी ठरतात.

लोकबिरादरीत १८२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

हेही वाचा -सिद्धिविनायकाच्या घुमटाला सोन्याची झळाळी

डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या पुढाकाराने १९८६ पासून शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३४ वर्षांपासून रुग्णांना जीवदान देण्याचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १७ ते १९ जानेवारी २०२० पर्यंत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शस्त्रक्रिया पूर्व नियोजन लोकबिरादरी रुग्णालयाचे डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांनी केले. नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने हॉड्रोसिल, हर्निया, फाटलेले ओठ, स्तनावरील गाठी, गर्भाशयाच्या गाठी, शरिरावरील गाठी, मोतीबिंदू इत्यादी आजारांनी ग्रस्त १८२ रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

शल्यचिकित्सक डॉ. गाडे, डॉ. अजित, डॉ. कळमकर, डॉ. लंजे, डॉ. हजारे, डॉ. कवाडकर, डॉ. राजुरकर, डॉ. पाटेकर, डॉ. मेघा, डॉ. सत्कार, डॉ. प्रथमेश, डॉ. धिंग्रा, डॉ. स्नेहल, डॉ. देशपांडे इत्यादींनी शस्त्रक्रिया केल्या. डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. निलोफर, डॉ. तुषार, जगदिश बुरडकर, गणेश हिवरकर, अरविंद मडावी, विनोद बानोत, रमिला वाचामी, शंकर गोटा, संध्या येम्पलवार, प्रकाश मायकरकार, शारदा बुरडकर, शारदा भसारकर, जुरी गावडे, दिपमाला भगत, सविता मडावी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

Last Updated : Jan 21, 2020, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details