महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID 19 : सिरोंचा उर्स उत्सवातील धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रम रद्द - उर्स जत्रा सिरोंचा बातमी

उर्स यात्रेनिमित्त रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन मशीद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र, कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे उर्सच्या जत्रेवर कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सिरोंचा येथील उर्स जत्रेच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

सिरोंचा उर्स उत्सवातील धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रम रद्द
सिरोंचा उर्स उत्सवातील धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रम रद्द

By

Published : Mar 12, 2020, 5:40 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यातील सिरोंचा येथे दरवर्षी १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लाह बाबा उर्स जत्रेचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील ही यात्रा आयोजित करण्यात आली. मात्र, कोरोना विषाणूंचा धोका टळेपर्यंत धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रमांना स्थगिती देण्याची सूचना गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सिरोंचा उर्स उत्सवातील धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रम रद्द

जिल्ह्यात उर्स यात्रेनिमित्त रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन मशीद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे उर्सच्या जत्रेवर कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून सिरोंचा येथील उर्स जत्रेच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार संबंधित उर्समध्ये उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे इत्यादी आवश्यक धार्मिक बाबी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही. यात्रा, दुकाने, आकाशपाळणे लावता येणार नाही. स्वागत समारंभ, कव्वाली, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. कोरोना विषाणूंचा संसर्ग होणार नाही याची अध्यक्ष मशीद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी सिरोंचा यांनी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा -बेबी मडावीच्या स्मरणार्थ भामरागडमध्ये स्मारक; पालकांनी नक्षल्यांविरोधात काढली आक्रोश रॅली

सिरोंचा येथे उर्स जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून येथे येऊ नये, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये शेजारील तेलंगाणा, छत्तीसगड राज्य तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनालाही प्रशासनाने याबाबत सूचना दिल्या आहेत. सिरोंचा येथे दरवर्षी होणाऱ्या या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणूनही या उर्सकडे पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याअनुषंगाने मशीद, दरगाह, कब्रस्थान, ईदगाह ट्रस्ट कमिटी व उर्स आयोजन समितीच्या वतीने महिनाभरापासून तयारी केली जात आहे. त्यामुळे उर्स नेहमीप्रमाणे आयोजित करण्याबाबत ट्रस्ट समितीचे पदाधिकारी आग्रही होते. मात्र, तहसीलदार रमेश जसवंत यांनी कोरोनाचे सावट सांगत वेगळी भूमिका घेतली. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उर्सच्या ठिकाणी लोकांना जाण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच येथे होणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांचा हिरमोड झाला.

हेही वाचा -गडचिरोलीत 30 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details