गडचिरोली - चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या महाविद्यालयासाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने अलीकडेच शेतकऱ्याना झालेले नुकसान पाहता शेतकऱ्याच्या मुलासाठी येत्या उन्हाळी परिक्षासाठीचे शैक्षणिक शुल्क पुर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जवळपास 65 हजार पैकी 55 हजार विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंडवाना विद्यापीठ : शेतपिकाच्या नुकसानीमुळे विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा शुल्क माफ
गडचिरोली जिल्ह्यातल्यातील गोंडवाना विद्यपीठाने शेतकऱ्याच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या मुलांसाठी उन्हाळी परिक्षेसाठीचे शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. यामुळे जवळपास ६५ हजार पैकी ५५ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न 211 महाविद्यालये चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात असुन यात बहुसंख्य मुले ही शेतकऱ्याची आहेत. अलीकडे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क भरणे कठीण होते. अशा विद्यार्थ्यासाठी परिक्षा आणि इतर शुल्क माफ करण्याची मागणी सिनेट सदस्य संजय रामगिरीवार यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत केली होती. अखेर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी परीक्षेचे शैक्षणिक शुल्क माफ करत असल्याची घोषणा केल्याने विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.