महाराष्ट्र

maharashtra

अहो आश्चर्यम...! गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा चक्क मध्यरात्री

By

Published : Oct 10, 2019, 6:10 PM IST

Updated : Oct 10, 2019, 6:17 PM IST

गोंडवाना विद्यापीठ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. आता विद्यापीठाने हिवाळी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये चक्क रात्रीची वेळ टाकली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बघितले असता आता आपल्याला रात्री पेपर द्यावे लागणार, या भीतीने तेही घाबरले.

गोंडवाना विद्यापीठ

गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठाने बुधवारी त्यांच्या संकेतस्थळावर बीई सिव्हिलच्या सातव्या सेमिस्टरचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, यामध्ये परीक्षेची वेळी 9:30 PM ते 12: 30 PM अशी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला रात्री पेपर द्यावे लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

गोंडवाना विद्यापीठाचे वेळापत्रक

गोंडवाना विद्यापीठ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. आता विद्यापीठाने हिवाळी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये चक्क रात्रीची वेळ टाकली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बघितले असता आता आपल्याला रात्री पेपर द्यावे लागणार, या भीतीने तेही घाबरले. त्यानंतर ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. विद्यापीठाने अनावधानाने चूक झाल्याचे मान्य केले. तसेच तत्काळ वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

आश्चर्यकारक...! गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा चक्क रात्री
Last Updated : Oct 10, 2019, 6:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details