महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियोजन समितीत योग्य नियोजन करा; गडकरींनी टोचले पालकमंत्री-अधिकाऱ्यांचे कान - city

गडचिरोली जिल्हा मागास आहे, मागास आहे म्हणून चालणार नाही तर विकासासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन समितीच्या बैठकीत योग्य नियोजन करायला हवे.

gadkari

By

Published : Feb 18, 2019, 9:55 PM IST

गडचिरोली -गडचिरोली जिल्हा मागास आहे, मागास आहे म्हणून चालणार नाही तर विकासासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन समितीच्या बैठकीत योग्य नियोजन करायला हवे. सध्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे शासकीय कामे होतील कशी असा प्रश्न करीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री, अधिकारी यांच्यासह राज्य सरकारचे कान टोचले.


गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विविध योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते सोमवारी बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जेथे रस्ते, वीज, संवादाची सुविधा आणि पाणी उपलब्ध असते तेथेच उद्योग येतात. त्यामुळे या जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारने महाराष्ट्रात ४० हजार कोटींचे सिंचन प्रकल्प सुरु केले. यामुळे राज्याचे सिंचन ४० टक्क्यांवर पोहचले आणि शेतकऱ्यांचे उत्पादन अडीच टक्क्यांनी वाढेल. दळणवळण आणि सिंचन एकाच वेळी व्हावS यासाठी ब्रीजकम बंधारे बांधण्याचे काम सुरु आहे. कृषी महाविद्यालय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. मात्र, शेतकऱ्यांना या महाविद्यालयांचा किती फायदा झाला, याचा हिशोब महाविद्यालयाने दिला पाहिजे, असा दम गडकरी यांनी दिला.


पारंपरिक पिके घेण्यापेक्षा बाजारात कशाला मागणी आहे, ते लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिके घ्यावी, असे आवाहन करुन गडकरी यांनी जमीन व पाण्याची नियमित तपासणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. जैव इंधनावर विमाने उडविण्याचा प्रयोग आपण यशस्वी केला. त्यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. जेट्रोफा, करंज, टोळी इत्यादी वनस्पतींपासून जैवइंधन तयार होते. गडचिरोली जिल्हा अशा इंधनाचा हब होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी, असे आवाहनही गडकरी यांनी केले. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन करुन गडकरी यांनी देशात १७ रोडकम एअरपोर्ट बांधले असून, भविष्यात गडचिरोलीत असा प्रकल्प सुरु करता येईल, असे सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रिश आत्राम, खासदार अशोक नेते, डॉ. होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कुलगुरु डॉ. भाले यांचीही भाषणे झाली. खासदार अशोक नेते यांनी ओबीसी व आदिवासींवर अन्याय होऊ नये, यासाठी पावले उचलावी, सिटीसर्व्हे करण्यात यावा, बंगाली समाजाच्या जमिनी नियमानुकूल कराव्या, लोहप्रकल्प तत्काळ सुरु करावा यासह इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details