गडचिरोली- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजिस्टर ट्रस्ट संस्थेच्या प्रेरणेने आणि खासगी इव्हेन्ट मॅनेजमेंट एजन्सी इन्फोटेक फीचर्सच्या पुढाकाराने मुबंई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षिका सपना शंकर अडीचेर्लावार आणि शिक्षक अशोक बोरकुटे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान - मुलचेरा
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षिका सपना शंकर अडीचेर्लावार आणि शिक्षक अशोक बोरकुटे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०१९ साठी यापूर्वीच प्राथमिक शिक्षिका सपना अडीचेर्लावार आणि प्राथमिक शिक्षक अशोक बोरकुटे यांची अंतिम निवड करण्यात आली होती. १८ ऑगस्टला पश्चिम मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, सभागृहात आयोजित महासंमेलनात त्यांना सन्मान चिन्ह, लक्षवेधी गौरव पदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र व मानकरी बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. शामसुंदर महाराज, महास्वामी, रंगनाथ जोशी, रमेश आव्हाळ, अरुणा परब, मनीषा घार्गे, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे, के. एल. गोगावाले, अमोल सुपेकर यांच्यासह अन्य मान्यवर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले शेकडो शिक्षक उपस्थित होते. अत्यंत दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांचा मुंबई येथे सन्मान झाल्याने शिक्षक वर्गातून आणि मित्रपरिवारातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.