गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून पाऊसाने (Gadchiroli Heavy Rains) कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली सिरोंचा आहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतु ठप्प झाली तर गडचिरोलीला आज पासुन पुढील तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाआहे.
भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर पेरमिली गावाजवळच्या नाल्यावरुन एक ट्रक व तीन प्रवासी पुरात वाहुन गेली आहेत. चालकांचा शोध चालू आहे. भामरागड आलापल्ली मार्गावरील कुमरगुडा नाल्यावरील नवीन ब्रीज बांधकाम सुरु आहे.त्या ठिकाणी पर्याय मार्ग वाहुन गेल्याने स्थानिक प्रशासानाकडुन युध्द पातळीवर दुरुस्ती करुनही तीन दिवसांत तीनदा वाहणे वाहुन गेली आहे.तीन दिवसापासून दिवसभर वाट बघत नाल्यावर अडकुन पडले आहेत. तर ग्रामस्थासमोर जीव मुठीत धरुन नाला पार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 60 ते 70 गावांना संपर्क तुटण्याची भीती आहे. कायमची उपाय योजना आखण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.