महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

gadchiroli rain : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत पूरस्थितीची शक्यता - gadchiroli flood situation

जिल्ह्यातील विविध नद्या, उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या, धरणे यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By

Published : Jul 23, 2021, 8:04 PM IST

Updated : Jul 23, 2021, 8:10 PM IST

गडचिरोली - दोन दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील विविध नद्या, उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या, धरणे यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

'नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे'

सध्या जिल्ह्याच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी ही कालेश्वरम स्टेशन (राज्य तेलंगाणा) येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे व गोदावरी नदी ही सिरोंचा नजीकच्या कालेश्वरम येथून प्रवेश करून पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे इंद्रावती नदीस मिळते. सध्या नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता गोदावरी नदीकिनारी गावांनी विशेष सतर्कता बाळगावी. तसेच मेडीगड्डा बॅरेज (ता. सिरोंचा)मधून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे (सद्यस्थितीत 11.50 लक्ष क्युसेक) काही भागांतील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरेवला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडीगटृटा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी. तहसीलदार सिरोंचा यांनी या भागात वेळोवेळी अधिनस्त यंत्रणेमार्फत दवंडी द्यावी तसेच तहसीलदार सिरोंचा यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करून विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तत्काळ या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढली

प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यामुळे आणि वर्धा नदीतून येणाऱ्या अधिकच्या विसर्गामुळे या नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. शिवाय गोसेखुर्द धरणातून सद्यस्थितीमध्ये 4113 क्युमेक एवढा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा नदीकिनारच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 23, 2021, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details