गडचिरोली - तंबाखूजन्य पदार्थ व प्लास्टिक मुक्त शहरांच्या मागणीसाठी भामरगड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. भामरगड पोस्ट चौकातून निघलेली ही रॅली तंबाखू मुक्तीच्या घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरली. यानंतर मुख्य चौकात सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या, खर्रपन्नी, बाबूल यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी केली.
यावेळी ठाणेदार संदीप पाटील यांनी व्यसमुक्तीचा संदेश दिला. प्रमुख्याने खर्रा (मावा), दारू आणि प्लास्टिक मुक्त शहरांसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यासाठी नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेऊन दारू किंवा खर्रा विकणाऱ्यांविरोधात समोर येण्याचे त्यांनी आवाहन केले.