गडचिरोली - जिल्ह्यातील आष्टी ते अहेरी महामार्गवर दीना नदी ते सुभामग्राम दरम्यान, 65 गोवंशाची वाहतूक करीत असताना अहेरी पोलिसांनी कारवाई करत 3 ट्रक जप्त केले. यासह पोलिसांनी जनावरांची सुटका करून कोंडवाड्यात टाकण्यात आले आहे.
अहेरी पोलीस रात्रीच्यावेळी बोरी येथे गस्तीवर असताना पहाटे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान (TS 12-UC-9336 , TS-12-U-8749 आणि MH-40- 3317) क्रमांकाचे तीन ट्रक आष्टीवरून अहेरीकडे येत असताना पोलिसांनी हात दाखवून थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकांनी ट्रक न थांबवता आणखी स्पीड वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबविले असता अंधाराचा फायदा घेऊन तीनही ट्रकचे ड्रायव्हर पडून जाण्यास यशस्वी झाले आहेत. मात्र, ट्रकमध्ये झोपलेल्या दोन क्लिनरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.