गडचिरोली - गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गडचिरोली पोलीस दलाच्या १५ जवानांना वीरमरण आले होते. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. गडचिरोली पोलीस दलाने या वीर जवानांचे स्मरण करत नक्षलविरोधी लढ्यात वीरमरण आलेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहिली.
गडचिरोली पोलीस दलाकडून जांभूळखेडा घटनेतील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली - कुरखेडा गडचिरोली नक्षल हल्ला २०१९
गडचिरोलीजवळ चुरमुरा येथे राहणारे हुतात्मा जवान किशोर बोबाटे यांच्या कुटुंबीयांनी व गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत हुतात्मा जवान किशोर बोबाटे यांचे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
गडचिरोली पोलीस दलाकडून जांभूळखेडा घटनेतील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली
नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे स्मरण करत गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यात यश प्राप्त केले. शहीद बहादूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता या जिल्ह्यातून नक्षलवादाला हद्दपार करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.