गडचिरोली -माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपाईने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (३६) असे मृत पोलीस शिपाईचे नाव आहे.
माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी तैनात पोलीस शिपाईने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या - माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी तैनात पोलीस शिपाईची आत्महत्या
अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपाईने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (३६) असे मृत पोलीस शिपाईचे नाव आहे. नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.

पोलीस शिपाई
नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नितेशची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नितेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्यस होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
TAGGED:
Gadchiroli police