महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंभीर गुन्हे असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांकडून अटक - two Naxalites arrested

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाला गुरुवारी यश आले.

Naxalites
नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक

By

Published : Feb 11, 2021, 8:19 PM IST

Updated : Feb 11, 2021, 9:08 PM IST

गडचिरोली - गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाला गुरुवारी यश आले. मंगलु कुडयामी व मदनया ऊर्फ सूर्या सोमया तलांडी असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

प्राणहिता सी-६० पथक व दामरंचा येथील पोलीस पथकाची कारवाई -

दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांकडून अटक

जहाल नक्षलवादी मंगलु कुडयामी (वय २० वर्ष) हा ईरपागुट्टा येथील बिजापूर जिल्ह्यतील रहिवासी असून सध्या तो सँड्रा दलम छत्तीसगडमध्ये, तर मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी (वय ३८ वर्ष) हा बिजापूर जिल्ह्यतील येडापल्ली येथील रविवासी असून, सध्या तो ईडापल्ली जनमिलीशिया कंपनी दलम येथे कार्यरत आहे. गुरुवारी गडचिरोली पोलिसांचे प्राणहिता येथील सी-६० पथक व दामरंचा येथील पोलीस पथक भंगारामपेठा, कुर्ताघाट जंगल परिसरात संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असताना दोन्ही नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांवरही अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल-

मंगलु वंजा कुडयामी हा २०१८ पासून सँड्रा दलममध्ये दलम सदस्य म्हणून कार्यरत आहे. २०१९ साली उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दीत पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी हा सन २००५ पासून नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असुन सुरुवातीस तो सँड्रा दलममध्ये कार्यरत होता. सन २००७ मध्ये त्याची ईडापल्ली जनमिलीशीया कंपनी दलममध्ये बदली झाली व सध्या त्याच नक्षल कंपनीमध्ये सेक्शन कमांडर पदावर कार्यरत आहे. त्याचबरोबर सन २०१९ साली दामरंचा हद्दीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्यांच्यावर छत्तीसगडमधील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पर्सेगुडम पोलीस स्टेशन छत्तीसगड येथे त्याच्या विरुद्ध स्टँडींग वारंट काढण्यात आले आहे. या दोन्ही जहाल नक्षलवाद्यांवर उप पोलीस दामरंचा ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३५३ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या दोघांचा आणखी किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा गडचिरोली पोलीस तपास करत आहेत.

Last Updated : Feb 11, 2021, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details