महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली पोलिसांकडून 10 सट्टेबाजांना अटक; 21 लाखांची रक्कम जप्त

गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाइन जुगार खेळण्याचे रॅकेट सक्रिय असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवत दहा सट्टेबाजांना अटक केली आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : Jul 31, 2021, 8:42 PM IST

Updated : Jul 31, 2021, 9:51 PM IST

गडचिरोली - क्रिकेट, फुटबॉल आणि अन्य क्रीडा स्पर्धांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दहा जणांना शुक्रवारी (दि. 30 जुलै) गडचिरोलीच्या आष्टी पोलिसांनी अटक केली. सट्ट्यासाठी वापरण्यात आलेली 21 लाख 33 हजार 140 रुपये इतकी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सट्टेबाजीप्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. दहाही आरोपींना चामोर्शी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बडे मासे आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

माहिती देताना अहेरीचे उपविभागीय अधिकारी

ऑनलाइन जुगार खेळण्याचे रॅकेट सक्रिय असल्याबाबतच्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि. 30 जुलै) गडचिरोली पोलीस दलाने कारवाई करत आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदप्पवार, चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे आष्टी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींसह पोलीस पथक

तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी गेली असून रात्रंदिवस सोशल मिडीयाचा वापर करीत असते. त्याद्वारे विविध प्रकारची गुन्हेगारी वाढत असल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहे. अशाप्रकारे ऑनलाइन जुगार खेळणारे रॅकेट गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार शुक्रवारी (30 जुलै) उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांच्या पथकाने आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी,मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी, आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदप्पवार यांना चौकशीसाठी बोलवले. चौकशीतहे Betx 1.co आणि nice.7777.net ​या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार प्लॅटफार्मच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल आणि इतर बाबी संबंधी बुकी म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर ऑनलाइन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक असून ते युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट/क्लायंट तयार करत असल्याची माहिती समोर आली असता सर्व आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे अहेरी येथे भा.द.वि.कलम 420, 465, 468, 471 सह जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून ऑनलाइन जुगारासाठी वापरण्यात येणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे ऑनलाइन जुगाराचे मोठे राज्यस्तरीय रॉकेट कार्यरत असल्याचे दिसून येत असून त्याअनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा -8 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Last Updated : Jul 31, 2021, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details