महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला नक्षलवादी गुड्डू कुडयामी गडचिरोली पोलिसांच्या अटकेत

खून, जाळपोळ, चकमकी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला जहाल नक्षलवादी गुड्डू रामू कुडयामी याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

पोलीस ठाण्यात नेताना
पोलीस ठाण्यात नेताना

By

Published : Feb 22, 2021, 11:35 PM IST

Updated : Feb 23, 2021, 1:04 AM IST

गडचिरोली - खून, जाळपोळ, चकमकी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला जहाल नक्षलवादी गुड्डू रामू कुडयामी याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. अहेरीच्या प्राणहिता पोलीस मुख्यालयातील विशेष अभियान पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुड्डू कुडयामी (वय 23 वर्षे, रा. सागमेटा ता. भैरमगड जि. बिजापूर, छत्तीसगड) यास अटक केली.

आरोपीला नेताना पोलीस

सी-60 पथकाला मिळालेल्या माहितीवरून कारवाई

22 फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सी-60 पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अटक करण्यात यश आले.

अनेक गुन्ह्यात सहभाग

जहाल नक्षली गुड्डू राम कुडयामी हा 2017 मध्ये मुक्कावेली आरपीसी मिलीशिया प्लॉटूनमध्ये भरती झाला. तो हत्यारे सोबत बाळगत होता. त्याने 2017 साली 15 दिवसांचे गरतूल येथे नक्षली प्रशिक्षण घेतले होते. छत्तीसगडमधील सागमेटा येथील विज्या कुडयामी, दामाराम या गावातील गुज्या वड्डे, मंडेम गावातील बुधू तसेच लंकापार व येडसगुंजी येथील आरक्षक रमेश यांच्या खुनामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याचबरोबर परसेगड येथे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यामुळे परसेगड पोलीस ठाणे (जि. बिजापूर) येथे गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त आणखी किती गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहेत.

किष्टापूर नाल्यावर जाळपोळ घटनेत सहभाग

जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किष्टापूर नाल्यावर सन 2020 साली नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग
होता. त्यामुळे त्याच्यावर जिमलगट्टा येथे भा.दं.वि. कलम 435, 427, 324 गुन्हा दाखल होता. त्यामध्ये तो फरार होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे. मागील 15 दिवसांत एकूण तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

Last Updated : Feb 23, 2021, 1:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details