महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या - गडचिरोली नक्षलवादी न्यूज

नक्षलवाद्यांनी भिमनखोजी येथील एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. मनोज दयाराम हिडको (वय, 17) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता.

नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या
नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या

By

Published : Nov 29, 2019, 9:48 PM IST

गडचिरोली - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी भिमनखोजी येथील एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. मनोज दयाराम हिडको (वय, 17) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


बुधवारी रात्री तीस ते पस्तीस सशस्त्र नक्षलवादी मनोज हिडकोच्या घरी गेले. त्यांनी त्याला झोपेतून उठवून गावातील बस थांब्यावर नेले. तेथे गोळ्या घालून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर सुप्रीम कंपनीकडून महामार्ग दुरुस्तीस सुरुवात
२ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांनी 'पीपल्स गोरिल्ला आर्मी'ची स्थापना करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यापुर्वी लोकांमध्ये दहशत पसरवण्याच्या हेतूने नक्षल्यांनी हे कृत्य केले. गुरुवारी देखील नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून आणि बॅनर बांधून रस्ता अडवला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details