गडचिरोली - जाभूळखेडा येथे नक्षलवाद्यांच्या स्फोटात वीरमरण आलेल्या १५ जवानांना अंतिम श्रध्दाजंली देण्यात आली आहे. गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर ही श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहून श्रध्दाजंली दिली. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही श्रध्दाजंली वाहिली.
Gadchiroli naxal Attack - मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५ हुतात्मा जवानांना वाहिली आदराजंली - gadchiroli naxal attack
जाभूळखेडा येथे नक्षलवाद्यांच्या स्फोटात वीरमरण आलेल्या १५ जवानांना अंतिम श्रध्दाजंली देण्यात आली आहे.
हुतात्मा जवानांना अंतिम सलामी देण्यासाठी तयारी पूर्ण
कुरखेडा तालुक्यातील लेंडारी पूल येथे भुसुरुंग स्फोटात वीरमरण आलेल्या 15 जवान आणि एका खासगी वाहनचालकाच्या मृतदेहांवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत जवानांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. या श्रध्दाजंली कार्यक्रमानंतर वीरमरण आलेल्या जवानांचे मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले जातील.
Last Updated : May 2, 2019, 4:22 PM IST