महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली हल्ला : नक्षल्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक करा, हुतात्मा जवानांच्या नातेवाईंकाची मागणी - martyrs-relative

सर्जिकल स्ट्राईक हा केवळ देशाच्या सीमेवर न करता नक्षलग्रस्त भागातही करण्यात यावा, अशी मागणी गडचिरोली भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या नातेवाईकांनी केली आहे.

नक्षल्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक करा

By

Published : May 2, 2019, 1:16 PM IST

गडचिरोली- जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील ३ जवानांना वीरमरण झाले आहे. या हल्ल्याला शासनाने प्रतिउत्तर देऊन सर्जिकल स्ट्राईक करावे, अशी मागणी लाखांदूर आणि साकोलीच्या वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील ३१ वर्षीय भूपेश वालोदे, साकोली तालुक्यातील कुंभली गावातील ३३ वर्षीय नितीन घोरमारे व लाखांदूर तालुक्यातील दयानंद शहारे ह्या ३ जवानांना वीरमरण आले. नितीन यांच्या परिवारात आई-वडील व पत्नी व ३ महिन्याची मुलगी असून २०१२ मध्ये ते पोलीस दलात भरती झाले होते.

यावेळी या जवान नितीन यांच्या कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त करत सर्जिकल स्ट्राईक हा केवळ देशाच्या सीमेवर न करता नक्षलग्रस्त भागातही करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर दयानंद शहारे हे महाराष्ट्र पोलीस सेवेत लवकरच रुजू होणार होते. त्यासाठी त्यांनी विभागांतर्गत परीक्षाही दिली होती. मात्र, काल त्यांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे साकोली व लाखांदूर तालुक्यात शोककळा पोहचली. आज सायंकाळी त्यांचा पार्थिवावर अंत्यसंसकार केले जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details