गडचिरोली - कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 35 हजार 481 कुटुंबातील 1 लाख 22 हजार 516 जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 224 जण सारी व आयएलआयचे रुग्ण आढळले. तसेच, ऑक्सिजनची पातळी आवश्यकतेपेक्षा (95) कमी असलेले 640 जण मिळाले आहेत. यातील संभावित रुग्ण म्हणून 250 जणांना जवळच्या कोविड केअर सेंटरला पाठविण्यात आले आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेतून सापडले ऑक्सिजन पातळी कमी असलेले 640 रुग्ण - Gadchiroli maze kutumb mazi jababdari mission news
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहेत. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 ची चाचणी करून पुढील उपचार केले जातील.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी करून पुढील उपचार केले जातील. जिल्हयात 952 आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे सर्वेक्षण सुरू आहे. अजून मोठया प्रमाणात लोक जोडले जात आहेत.