महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 11, 2021, 10:40 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात रविवारी 296 बाधितांची नोंद, तर सहा जणांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के इतका आहे.

file photo
file photo

गडचिरोली : आज (रविवारी) जिल्ह्यात 296 नवीन कोरोना बाधित आढळले आहे. तर 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 687 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सद्या 1 हजार 576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण 133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मृत्यू दर वाढतोय

दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के इतका आहे.

नवीन 296 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 114, अहेरी तालुक्यातील 41, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 12, चामोर्शी तालुक्यातील 18, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 6, कोरची तालुक्यातील 28, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 18 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 102 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड 7, चामोर्शी 6, धानोरा 4, मुलचेरा 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 5 येथील जणाचा समावेश आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत झालेले लसीकरण

जिल्ह्यातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल (शनिवारी) पहिला लसीकरणाचा डोस 2 हजार 10 व दुसरा डोस 185 नागरिकांना देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 992 जणांना पहिला तर 11 हजार 103 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details