महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 229 नवीन कोरोनाबाधितांची नोंद - Corona test in gadchiroli

शुक्रवारी जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11831 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10513 वर पोहचली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Apr 9, 2021, 9:14 PM IST

गडचिरोली: जिल्ह्यात शुक्रवारी 229 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 71 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला. सद्या 1 हजार 193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत 125 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथील एका 73 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.08 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के इतका आहे.

या तालुक्यात आढळले रुग्ण -

नवीन 229 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 116, अहेरी11, आरमोरी 17, भामरागड 17, चामोर्शी 15, धानोरा 5, एटापल्ली 9, कोरची 11, कुरखेडा बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 11 व इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 19, अहेरी 11, आरमोरी 7, भामरागड 11, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 01, कुरखेडा 1, तसेच वडसा 15 येथील जणांचा समावेश आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंत लसीकरण

जिल्ह्यातील शासकीय 67 व खासगी 2 अशा मिळून 69 बुथवर लसीकरण सुरू आहे. यात पहिला लसीकरणाचा डोस 3 हजार 355 व दुसरा डोस 249 नागरिकांना देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 43 हजार 857 तर दुसरा डोस 10 हजार 704 नागरिकांना देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details